Breaking News

 

 

कोल्हापूरकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रभागी : आ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील स्वाभिमानी पेठेचा परिसर नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रभागी राहिली असून या लोकसभेला प्रा. संजय मंडलिक यांच्या रूपाने शिवसेनेचा खासदार निवडून द्या, असे आवाहन आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्या प्रा.मंडलिक यांच्या शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ परिसरातील पदयात्रेप्रसंगी बोलत होत्या.

आ. गोऱ्हे म्हणाल्या की, प्रा.संजय मंडलिक यांचा जनसंपर्क चांगला असल्याने ते विजयी होती, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आ.क्षीरसागर म्हणाले की, प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी घरोघरी धनुष्यबाण पोहचवण्याचे आवाहन केले.

प्रचार फेरीची सुरुवात शिवसेना शहर कार्यालयपासून काळाइमाम तालीम, बाजारगेट रोड, बजाप माजगावकर तालीम, जोशी गल्ली कॉर्नर, पिवळावाडा चौक, बुरुड गल्ली,  मृत्युंजय तरून मंडळ, निकम गल्ली, गिरणी कॉर्नर, शिपुगडे तालीम, डांगे गल्ली, तोरस्कर चौक, जुना बुधवार तालीम, भगतसिंग चौक, सोन्या मारुती चौक मार्गे शिवसेना शहर कार्यालयपर्यंत काढण्यात आली.

यावेळी देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, निशिकांत मेथे,धनजय सावंत, माजी नगरसेवक शशिकांत पाटील, ऋतुराज क्षीरसागर, उदय भोसले, सचिन ढणाल, सुनील ब्रम्हपुरे, शिवसेना उपशहरप्रमुख अनिल पाटील, अजित राडे, सुशील भांदिगरे व तालीम संस्था मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे