कोल्हापूर (प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक व शिक्षण प्रसारक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही पुष्प वाहून अभिवादन केले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. संभाजी शिंदे, डॉ. जगदीश सपकाळे, सुनील जाधव, आनंदा वारके, सुरेखा आडके यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.