Breaking News

 

 

प्रियांकांनी काँग्रेस सोडून बांधले ‘शिवबंधन !

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी आज (शुक्रवार) सकाळी राजीनामा दिला आणि दुपारी अनपेक्षितपणे शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केली, परंतु या गंभीर प्रकरणाची पक्षानं दखल घेतली नाही. तसेच मला, माझ्या कुटुंबियांना आणि मुलांना खूप वेळा धमक्या देण्यात आल्या असा आरोप प्रियांका यांनी केला.

आज दुपारी प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. . लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती, पण तिकीट न दिल्याने मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला होता. पक्षाची सेवा करताना मला, माझ्या कुटुंबीयांना व मुलांना किती धमक्या आल्या, किती शिवीगाळ झाली याची तुम्हाला आठवण करून द्यायला नकोच. माझ्या आकांक्षाना काँग्रेस पक्ष योग्य वाव देईल या अपेक्षेमुळे मी कधीही काही मागितलं नाही. मला खेद वाटतो की काँग्रेस पक्ष महिलांची सुरक्षा, सन्मान व सबलीकरणाला प्राधान्य देतो, परंतु ते कृतीत मात्र दिसलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाचं काम करत असताना काही ज्येष्ठ नेते अत्यंत असभ्यपणे माझ्याशी वागले परंतु त्यांच्या या दुर्वर्तनाकडे निवडणुकीची गरज म्हणून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मला जड अंत:करणाने काँग्रेस सोडणे भाग पडले.

2,091 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे