Breaking News

 

 

खासदार दोन नंबरचे धंदे करून मोठे झाले : प्रा.मंडलिक

बाजारभोगाव (प्रतिनिधी) : सध्याचे खासदार दोन नंबरचे धंदे करून मोठे झाले आहेत. त्यांना ग्रामीण भागातील लोकांची दुःखं काय आहेत हे दिसतच नाही. योजना सरकारच्या आणि महाडिक सांगताहेत मी आणल्या म्हणून… अशा खोटं बोलणाऱ्याला जनताच धूळ चारेल अशी टीका शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी बाजारभोगाव येथील प्रचारसभेत केली.

ग्रामीण भागामध्ये गवा रेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. पिकांची नासधूस केली जात आहे हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसायला कोणी वाली उरला नाही. आणि दुसऱ्या बाजूला खासदार भीमा कृषी प्रदर्शनात बारा कोटींचा रेडा नाचवतात आणि लोकांची दिशाभूल करून त्यांचाच पैसा उडवतात. अशीही टीका त्यांनी केली.

या वेळी अण्णासाहेब विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आ. चंद्रदीप नरके, अजित नरके, पं. समिती सदस्य प्रकाश पाटील, प्रकाश काटकर आदी मान्यवर उपस्थित होते

1,100 total views, 3 views today

One thought on “खासदार दोन नंबरचे धंदे करून मोठे झाले : प्रा.मंडलिक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा