Breaking News

 

 

मी असा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल : चंद्रकांतदादा

गारगोटी (प्रतिनिधी) : खा. महाडिक व त्यांच्या बगलबच्च्यांकडून माझ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. पण त्यांना एकच सांगू इच्छितो, माझी छाती फाडल्यास त्यामध्ये फक्त आणि फक्त धनुष्यबाण व प्रा. संजय मंडलिक हेच दिसतील. यापुढे महाडिकांनी व आमच्या पक्षात आलेल्या त्यांच्या बगलबच्च्यांनी चुकीच्या बातम्या पसरवयाच्या बंद नाही केल्या तर असा बॉम्ब फोडेन की महाडिकांना प्रचार बंद करावा लागेल असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. ते कडगांव (ता. भुदरगड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलत होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विद्यमान  खासदारांनी मीच कोल्हापुरात विमान आणले, शिवाजी पूल बांधला, रेल्वेचा विस्तार केला, कोट्यवधी रुपयांचे रस्ते केले अशी वल्गना करत असून त्या कामांचे नारळही फोडत आहेत. परंतु त्यांना मला सांगावे वाटते की, युती शासनाने केलेल्या या सर्व कामांचे श्रेय घेण्याचा तुम्हाला अधिकार नसून ज्या पक्षाचे देशात ४ खासदार आहेत. अशा विरोधी पक्षाच्या खासदाराने मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला अशी टिमकी वाजवू नये. ही निवडणूक देशाचे भवितव्य व देश सुरक्षित ठेवणारी असून यामुळे मतदारांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती एकहाती सत्ता देण्याकरीता प्रा.संजयदादा मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची विनंती केली.   

या वेळी आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, युतीचे उमेदवार प्रा. संजयदादा मंडलिक यांच्याविषयी मतदार संघामध्ये लाट निर्माण झाली असून सर्वसामान्य जनतेने आपले मतदान कोणाला करावयाचे हे पक्के ठरवले असून आता ग्रामीण भागातील जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. खासदारांनी विकासाच्या नावाखाली ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक केली असून त्यामुळे त्यांच्याविषयी असणारी जनमानसातील विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे.

या वेळी माजी उपसभापती सत्यजीत जाधव म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून काम करत असलो तरी जिल्ह्याचे नेते आ. सतेज पाटील यांच्या आदेशानुसार प्रा.संजयदादा मंडलिक यांना विजयी करण्याकरीता जिवाचे रान करत आहोत. माजी सभापती बाबा नांदेकर म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे. त्याकरिता त्यांचे हात बळकट करण्यासाठी व कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. संजयदादा मंडलिक यांना खासदार करणे गरजेचे आहे. 

या वेळी ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, संघटनमंत्री बाबा देसाई, दत्तात्रय उगले, संदीप वरंडेकर, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रविण सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, विश्वजीत जाधव, अविनाश शिंदे, शिवाजी ढेंगे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

2,547 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा