Breaking News

 

 

आम्हाला गुंड नकोत, खासदार हवा : उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते.  विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढली आहे. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. ते रत्नागिरी येथील जाहीर सभेत बोलत होते.

विनायक राऊत यांनी कधीही हातातला झेंडा बदलला नाही. निष्ठा हवी असते. समोरच्या उमेदवाराकडून तुम्ही काय निष्ठेची अपेक्षा ठेवता अशी टीका उद्धव यांनी नारायण राणे यांच्यावर केली. आम्ही युती केली ती युती शेतकऱ्यांसाठी देश हितासाठी केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यासाठी युती केली. देव, देश आणि धर्मासाठी युती केली, असा विश्वास व्यक्त करत धनुष्यबाणाला आणि कमळाला मत म्हणजे तुमचे स्वतःचे स्वतःला मत आपल्या कुटुंबासाठी असलेल मत आहे असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी जनतेला केले.

750 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा