Breaking News

 

 

काँग्रेस-आपची युती नाहीच..! : स्वबळावर निवडणूक लढवण्याची केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्याच्या प्रस्तावास काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ दिल्लीतील सात आणि हरियाणा, चंदीगडमधील जागांवर स्वतंत्र लढेल, असा निर्णय आज (गुरुवार) जाहीर केला. यावर काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये.

भाजपप्रणीत ‘एनडीए’ला शह देण्यासाठी काँग्रेस-आपने एकत्र यावे, असा प्रस्ताव केजरीवाल यांनी मांडला होता. मात्र दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि दिल्लीमधील काही काँग्रेस नेत्यांचा या प्रस्तावाला विरोध होता. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रस्तावामध्ये फारसा रस दाखवला नाही. त्यामुळेच अखेर केजरीवाल यांनी अखेर काँग्रेसचा नाद सोडला आणि आप स्वबळावर निवडणूक लढेल, असे जाहीर केले आहे.

276 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे