Breaking News

 

 

महापालिकेतर्फे मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा मतदान 2019 च्या अनुशंगाने आज मतदानाचा टक्का वाढावा. तसेच मतदार जनजागृतीच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक निवडणूक कृती कार्यक्रम (सिव्हीईईपी), जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी मैदान येथून सकाळी 8.00 वाजता मतदार जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली.

प्रारंभी शिक्षकांनी पथनाटय सादर केले. या रॅलीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, प्रशासन अधिकारी शंकर यादव, तसेच महापालिका कर्मचारी, प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षक सहभागी झाले होते. 
ही रॅली गांधी मैदान येथून खरी कॉर्नर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका इमारत, सी.पी.आर हॉस्पिटल, दसरा चौक मार्गे बिंदू चौकापर्यंत काढण्यात आली.

यावेळी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने मतदारांच्या ओळखीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पत्रके जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

294 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *