Breaking News

 

 

मोदींच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती ; आयएएस अधिकारी निलंबित

भुवनेश्वर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेणं एका अधिकाऱ्याला चांगलाच महागात पडलं आहे. संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यासाठी निवडणूक आयोगान ओडिशाच्या जनरल पर्यवेक्षकाला बुधवारी (१७ एप्रिल ) निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार, कर्नाटक कॅडरचे १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी मोहम्मद मोहिसन यांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचं पालन न करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांच्या अहवालाच्या आधारावर आयोगानं संबलपूरच्या जनरल पर्यवेक्षकांवर ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी (१६ एप्रिल रोजी) मोदींच्या हॅलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबलपूरमध्ये झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅलिकॉप्टरची चौकशी करणं निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येत नाही. एप्रिल २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निर्देशानुसार, एसपीजी सुरक्षा प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना अशा झाडाझडतीतून सूट प्राप्त होते.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगानं उपनिवडणूक आयुक्त धर्मेंद्र शर्मा यांना संबलपूरला पटवून पंतप्रधानांशी निगडीत या प्रकरणाची विस्तृत चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. 

1,368 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे