मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. दि. 18 सप्टेंबर रोजी ब्रह्मास्त्रचे बॉक्स ऑफिस वरील कलेक्शनमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली असून लवकरच हा चित्रपट २५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दहाव्या दिवशी १६.२५ ते १७.२५ कोटींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने २०९ ते २१० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ३६० कोटींची कमाई केली आहे.