Breaking News

 

 

काळ्या पाण्याच्या शिक्षेचा मोदींना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : गेली पाच वर्ष भाजपने जनतेची फसवणूक केली आहे. नोटबंदीच्या काळात जनतेला जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आधी या गोष्टींचा लेखाजोखा करावा असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला.

नोटाबंदीच्या काळात पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते, त्याचे काय झाले कसा सवालही सावंत यांनी उपस्थित केला. राज्याच्या मंत्रीमंडळात सोलापूरचे दोन मंत्री भाजपचे आहेत. महापालिकेतही त्यांचीच सत्ता असून शहरास पाच दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरचा किती विकास झाला हेही विनोद तावडें यांनी सांगावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

सुशीलकुमार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरचा कितपत विकास केला असा प्रश्न भाजपने उपस्थित केला असता यावर सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा केलेला विकास जनतेला माहित आहे भाजपसारखी जुमलेबाजी कॉंग्रेसने केलेली नाही असे सावंत यांनी सांगितले. पराभवाच्या भीतीमुळे भाजप नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते विरोधकांवर आरोप करत आहेत असेही सावंत म्हणाले.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा