कोल्हापुरातील शिवाजी मार्केटमधील दुकानाला आग : लाखोंचे नुकसान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या छ. शिवाजी मार्केटमधील एका किराणा मालाच्या दुकानाला आज (बुधवार) पहाटे शॉर्टसर्कीटमुळे  आग लागली. या मध्ये दुकानातील सर्व किराणा माल खाक झाला. अग्निशमन दल व नागरिकांच्या अथक प्रयत्नामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही तसेच, आग इतर ठिकाणी पसरली नाही. त्यामुळे मार्केटमधील सर्व दुकाने आगीपासून बचावली. 

शहराच्या मध्यभागी असलेल्या पाच मजली छ. शिवाजी मार्केटमध्ये भाजीमंडई, किराणा माल, कापड, ज्वेलरी, कटलरी अशी दुकाने व महापालिकेची कार्यालये आहेत. यापैकी तळमजल्यावरील राजेंद्र भरमाण्णा बुढढे यांचे दोन गाळयात किरणा मालाचे दुकान आहे. काल (मंगळवारी) बुढढे यांचा गणेश हा मुलगा रात्री दुकान बंद करून गेला.

आज पहाटे पाचच्या सुमारास वृत्तपत्र विक्रेते किरण व्हनगुत्ते हे पेपर टाकण्यासाठी मार्केटमध्ये गेले असता त्यांना बुढढे यांच्या दुकानातून धूर बाहेर पडत असल्याचे दिसले. त्यांनी त्वरित अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन  पथक घटनास्थळी आले. पण दुकानाचे शटर बंद असल्याने आत पाणी मारता येत नव्हते. अखेर शटरचे कुलूप तोडल्यानंतर संपूर्ण दुकानात पसरल्याने दुकानातील विक्रीसाठी ठेवलेला लाखोंचा किराणा माल जळून खाक झाला.

आगीमुळे आतील स्लॅब निखळले व पोटमाळ्यावरील माल जळाला. अग्नीशमन दलाचे तीन बंब, जवान, व्यापारी व नागरिकांच्या मदतीमुळे आग इतरत्र न पसरता आटोक्यात आली. आयुक्त कलशेट्टी यानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी काही नगरसेवक उपस्थित होते.

825 total views, 27 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram