Breaking News

 

 

राष्ट्रपतींबाबत अशोक गेहलोत यांचे वादग्रस्त विधान !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अशाच एका विधानामुळे वाद ओढवून घेतला आहे. राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव निश्चित करण्यापाठीमागे पंतप्रधानांना गुजरातच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या जातीच्या लोकांना खूश करायचे होते असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

गुजरातच्या निवडणुकीत पक्षाचा फायदा व्हावा यासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवले. त्यांच्या या खेळीमुळे कोळी समाजाला आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आले. कारण, गुजरातमध्ये आपले सरकार येणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यामुळे जातीय समीकरण बनवण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना स्पर्धेतून बाहेर करत रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती करण्यात आले, असे गहलोत म्हणाले.

याआधी बसपाच्या प्रमुख मायावती तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा नेत्या मनेका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावरही कारवाई झाली आहे. गहलोत यांच्या वक्तव्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकडे कोणीही तक्रार गेलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा