मुंडे परिवारात पुन्हा उफाळली भाऊबंदकी… : पंकजा मुंडेंना धक्का

परळी (प्रतिनिधी) : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे चुलत बंधू रामेश्वर मुंडे यांनी आज (बुधवार) भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडेंवर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये कार्यकर्त्यांचे कुठलेच काम होत नाही, सातत्याने अन्याय होत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे रामेश्वर मुंडे यांनी या प्रवेशानंतर स्पष्ट केले.

गोपीनाथ मुंडे यांचे बंधू व्यंकटराव मुंडे यांचे चिरंजीव असलेले भाजपचे युवा नेते रामेश्वनर मुंडे हे आतापर्यंत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे होते. मात्र नाराजी व्यक्त करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठा धक्का समजाला जात आहे. परळी शहरातील भाजपची यंत्रणा रामेश्वर मुंडे पाहत होते. यामुळे जवळच्या नात्यातील रामेश्वपर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर प्रवेश केल्याने पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या सोबत आता मुंडे घराण्यातील एकही भाऊ राजकारणात सोबत राहिलेला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची सभा परळी शहरातील मोंढा मैदानावर संपन्न झाली. या सभेला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, जि.प.सदस्य अजय मुंडे यांच्या उपस्थितीत रामेश्वर मुंडे यांनी प्रवेश केला.

935 total views, 15 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram