साध्वी प्रज्ञासिंह अखेर भाजपमध्ये !

नवी दिल्ली (वृतसंस्था):   मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (बुधवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपासून शिवराजसिंह चौहान, रामलाल आणि प्रभात झा हे भाजपचे बडे नेते साध्वी प्रज्ञा हिच्या संपर्कात होते. अखेर त्यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर साध्वी प्रज्ञा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञा यांना भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजप प्रवेशानंतर साध्वी प्रज्ञा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनही, असे तिने सांगितले.

याबाबत अजून भाजपने अधिकृतरित्या कोणताही भूमिका मांडली नसली तरी भाजपच्या नेत्यांकडून तसे संकेत मिळत आहेत. साध्वी यांच्या भाजप प्रवेशानंतर दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी सूचक ट्विट केले. भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर विरुद्ध दिग्विजय सिंह ?, असा संदेश या ट्विटमध्ये होता. भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. 

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते. 

237 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram