Breaking News

 

 

तृणमूल काँग्रेसची आमदार म्हणाली, सीआरपीएफच्या जवानांना झाडूने झोडा !

कोलकाता (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये भाषणं करताना अनेकदा नेत्यांची जीभ घसरते. प्रत्येक राजकीय पक्षात वाचाळ नेते आहेतच. पक्ष कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना तृणमूल काँग्रेसच्या आमदार रत्ना घोष यांनी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान दिसले तर त्यांना झाडूने झोडून काढा असे संतापजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

घोष या चकदाह मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ एका वृत्तावाहिनीने प्रसारित केला आहे. महिला मोर्चाच्या सदस्यांसमोरच्या भाषणात त्या म्हणाल्या की, लढाई जिंकायची असेल तर चांगले–वाईट असे काही बघितले जात नाही. लोकशाही किंवा लोकशाहीविरोधी तत्रांचा वापर करून आपल्याला जिंकावे लागेल. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना झोडल्याचे मी पाहिले आहे. त्या वेळी हाणामारी झाली होती. मात्र आता त्यांनी आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर महिला कार्यकर्ता, नेता आणि अन्य कार्यकर्त्यांनी झाडू घेऊन त्यांना झोडून काढले पाहिजे.

372 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा