कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे दोन शास्त्रज्ञ उपस्थित होते. त्यांनी सहभागींना अतिशय उपयोगी असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांविषयी सविस्तर माहिती दिली.

पहिल्या सत्रात डॉ. सी. गोपीनाथ यांनी फोटो ‘इलेक्ट्रॉन एमिशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. संजय चव्हाण यांनी डॉ. गोपीनाथ यांचा सत्कार केला. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. के. सिल्वराज यांनी सहभागींना ‘ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन अनालिसिस फोर ऍडव्हान्स मटेरियल’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठातील जीव-रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सोनवणे यांनी डॉ. के. सिल्वराज यांचा सत्कार केला. त्यावेळी प्रा. सोनवणे यांनी डॉ. सिल्वराज यांना शिवाजी विद्यापीठात बोलवल्याबद्दल प्रा. सोनकवडे यांचे आभार मानले. डॉ. सिल्वराज यांचे मार्गदर्शन सहभागींना त्यांच्या शोधकार्यामध्ये नक्की उपयोगी पडेल, असे मत प्रा. सोनवणे यांनी व्यक्त केले.

डॉ. सिल्वराज यांनी देखील सैफ सेंटर, शिवाजी विद्यापीठाचे कौतुक केले’ अशी अत्याधुनिक उपकरणे कार्यरत ठेवणे आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी प्रयत्न करणे हे खरंच कौतुकास्पद आहे.’ असे नमूद करून त्यांनी या केंद्राचे प्रभारी प्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे आणि त्यांच्या गटाचे कौतुक केले. सहभागी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचा परिसर अनुभवला. लीड बोटॅनिकल गार्डनची सफर केली आणि जैवविविधतेचा आनंद घेतला.