Breaking News

 

 

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानला अवकाळी पावसाचा तडाखा : ३१ ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादळी वारे, मुसळधार पावसासह झालेल्या गारपिटीचा फटका मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांना बसला आहे. गुजरात, राजस्थानमध्ये नऊ तर मध्य प्रदेशमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये वादळी वारे, मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. राजस्थानमधील प्रतापगढ आणि झालावाड या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट, बनासकांठा, पाटन, मेहसाणा, साबरकांठा, आणंद, खेडा येथेही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेशात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

513 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे