Breaking News

 

 

ट्रकला दुचाकीची धडक ; दिंडनेर्लीतील दोघांचा मृत्यू

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : रस्त्याकडेला उभा करण्यात आलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने  दोघांचा जागीच मृत्यू झाला. भैरीनाथ बाबुराव मेटील (वय ३७) व मोहन हिंदुराव बोटे  (वय ४०, रा.दिंडनेर्ली, ता.करवीर) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी  रात्री बाराच्या दरम्यान मिरज – पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाट्यानजीक घडला.    

एकादशीनिमित्त मोहन बोटे व भैरीनाथ मेटील हे दोघे दुचाकी (एम ०९ डीई ९४४२) वरून सायंकाळी  सातच्या दरम्यान गावातून पंढरपूरकडे निघाले होते. मिरज-पंढरपूर रस्त्यावरती तासगाव फाट्यानजीक रस्त्यावरती लावलेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने दोघांच्याही डोक्याला मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

4,003 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग