Breaking News

 

 

ट्रकचा हूड बांधताना तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू…

टोप (प्रतिनिधी) :  कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हालोंडी गावच्या हद्दीत ट्रकचा हूड बांधत असताना तोल जाऊन पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. गोपिनाथ रामराव मुंडे (वय २४, रा. वाघदरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली.

मुंडे हा हालोंडी गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीनाथ ट्रान्स्पोर्टच्या ऑफिस समोर ट्रक थांबवून ट्रकचा हुड बांधत होता. त्यावेळी त्याचा अचानक तोल गेल्याने तो समोर असणाऱ्या ट्रकच्या बंपरवर पडला. त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

249 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा