Breaking News

 

 

घराणे फोडणे ही ‘चंपा’ची चंपुगिरी : नवाब मलिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घराण्यात फोडाफोडी करणे ही चंपाची चंपुगिरी असल्याची टिका राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांनी आज (मंगळवार) केली. हे चंपुगिरी करणारे निवडणूकीनंतर संपणार असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले.

जयदत्त क्षीरसागर, रणजीतसिंह मोहिती-पाटील, सुजय विखे-पाटील यांच्या पक्ष सोडून जाण्याबाबत विचारले असता मलिक म्हणाले, होडीत बसून होडीलाच भोक पाडणारी ही प्रवृत्ती निघून गेली हे बरे झाले. जे निघून गेले ते पश्चातापाने होरपळून परत येतील. पण घराणे फोडणारे मात्र संपूण जातील. छप्पन पक्ष सर्व ताकदीनीशी एकत्र आल्याने देशात परिवर्तन होणारच आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीला कुठेही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले. भिमा-कोरेगांव प्रकरणानंतर युतीबाबत चीड आल्याने वंचित आघाडी निर्माण झाली. पण त्यामुळे मताचे विभाजन होणार असल्याने वंचित आघाडीला जनतेने स्विकारलेले नाही, हे निकालानंतरच कळणार आहे.

शरद पवार हे बारावे खेळाडू असल्याची टिका होत असल्याबद्दल विचारले असता मलिक म्हणाले, शरद पवार हे उत्तम कोच आहेत. ते अनेक नवे तेंडूलकर तयार करतील, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा