Breaking News

 

 

मोदींची लाट आता संपली, आता लोकांच्यात चीड : नवाब मलिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने केलेल्या घोषणा व आश्वासनांची पुर्तता केलेली नाही. उलट बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, समाजातील विविध घटकांवर अन्याय यामुळे आता मोदींची लाट संपली असून त्यांच्याबद्दल चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या कामाचे ऑडिटकरुनच जनता मतदान करणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केले.

नवाब मलिक म्हणाले, भाजप देशात ३६० जागा व राज्यात ४५ जागा मिळणार असल्याचा दावा करीत आहेत. देशात मुख्य पक्षांची आघाडी झाली असल्यामुळे मताचे विभाजन होणार नाही. त्यामुळे गेल्यावेळी ६९ टक्के जनतेने नाकारलेल्या भाजप पुन्हा सत्तेपर्यंत पोहचणार नाही. त्यांना देशात साठच्यावर जागा मिळणार नाही. सध्या निवडणूकपूर्व जाहीर झालेले वृत्तवाहिन्यांमधील अंदाज भाजपने दबावाने सादर करुन घेतले आहेत. प्रसिद्धी माध्यमे सत्ताधाऱ्यांना नव्हे तर विरोधकानाच प्रश्न विचारु लागले आहेत. हा देखील लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील आघात आहे.

घटना बदलण्याची भाषा करताना भाजपला गोळवलकर गुरुजींना अपेक्षीत राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे. तर आम्हाला शाहु, फुले, आंबेडकर, मौलाना आझाद यांच्या विचारांचा राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना समर्पित म्हणून मते मागणारे ३५० किलो आरडीएक्स आले कुठून याचे उत्तर देत नाहीत. भाजपच्या संकल्प पत्रात केवळ भावनिकता असून मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही. असे स्पष्ट मत मलिक यांनी मांडले. राज्यात नुकत्याच झालेल्या सात जागेंवरील मतदानात चार मंत्र्यांसह सर्व जागेवर भाजप अडचणीत असल्याचे चित्र आहे. यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यात निम्म्यांहून अधिक जागांवर यश मिळेल.

339 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग