Breaking News

 

 

मुस्लिमांनी मोदींविरोधात मतदान करावे : नवज्योतसिंग सिद्धू

दिल्ली (वृत्तसंस्था) :  धर्माच्या आधारावर मतदान करा असे आवाहन करणारे काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू  नवज्योतसिंग सिद्धू वादात अडकले आहेत. याआधी बसपाच्या कार्यकारिणी मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अशा वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. त्यांच्यापाठोपाठ  आता सिद्धू यांनीही मुस्लिम समुदायाला एकत्र येऊन मोदींविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. बिहारच्या कटिहार येथील आज (मंगळवार) एका प्रचारसभेत त्यांनी हे आवाहन करून नवा वाद निर्माण केला आहे.

या वेळी ते म्हणाले, अल्पसंख्याकांची लोकसंख्या मोठी आहे. तुमच्या एकजुटीचा षटकार मारा, मी तरुण असताना अनेकदा षटकार मारले आहेत, आता तुमचा नंबर आहे, असा षटकार मारा की ज्यामुळे मोदी बाँड्रीच्या बाहेर जातील.  जर तुम्ही एकजूट दाखवली तर मोदींना हरवणं शक्य होईल. हे लोक तुमच्यात फूट पाडत आहेत. ओवेसीसारख्यांना पाठबळ देऊन आणि तुमच्या (मुस्लिम) मतांची विभागणी करून त्यांना विजय मिळवायचा आहे.

या वक्तव्यामुळे मायावती, योगी आदित्यनाथ, आजम खान आणि मनेका गांधी यांच्याप्रमाणेच सिद्धू यांनाही निवडणूक प्रचारबंदीचा सामना करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

420 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे