Breaking News

 

 

काँग्रेसच्या आश्वासनामुळेच नक्षलवाद्यांचं धाडस वाढलं : पंतप्रधान

दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील कोरबामध्ये झालेल्या निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांमुळं नक्षलवाद्यांचं धाडस वाढलं आहे. यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे, असा आरोप मोदींनी आज (मंगळवार) केला.

पंतप्रधानांनी प्रचारसभेतील भाषणात काँग्रेसवर अनेक आरोप केले.  नक्षलवाद्यांना क्रांतिकारक म्हणण्यात कॉंग्रेसचे नेते व्यस्त आहेत. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकांवेळी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे जनतेचं लक्ष वेधलं होते. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झालेल्या परिसरात हा हल्ला झाला आहे. हे हल्ले का झाले ? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला

नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेले भाजप नेते भीमा मांडवी यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झालेल्या परिसरात हा हल्ला झाला आहे. हे हल्ले का झाले ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. छत्तीसगड राज्याला पुन्हा हिंसेकडे नेण्याचा कट आखला जात असून याला कॉंग्रेसच यासाठी जबाबदार आहे, असा आरोप केला. आमचं सरकार आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगतिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा