Breaking News

 

 

यापुढे कोणतीच निवडणूक लढणार नाही : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर (प्रतिनिधी) : यापुढे आपण कोणतीच निवडणूक लढविणार नाही. ना आमदारकीची ना खासदारकीची अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. आज ते सोलापुरातील काँग्रेस भवन येथील घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आ़.प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर यु़ एऩ बेरिया आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदाच्या निवडणुकीत लोकांचं प्रेम मिळत आहे. सोलापूरमधील मतदारांनी आतापर्यंत भरघोस सहकार्य केले आहे. आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊच असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली़. भाजपकडे विकासाचा अजेंडाच नाही़ रोज नवेनवे काही तरी घेऊन मतदारासमोर जाणारे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करीत आहेत असेही शिंदे म्हणाले.

186 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे