Breaking News

 

 

गावातील महिलांनी थांबवल शिवसेना आमदारांचे भाषण

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेल्या शिवसेना आमदाराला महिलांनी घेराव घालत गावातील पाणी टंचाईबद्दल जाब विचारला. गावात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यावर आधी बोला असे म्हणत महिलांनी आमदारच भाषण बंद पाडले. महिलांची आक्रमकता पाहून आमदार आणि प्रचाराला गेलेल्या कार्यकर्त्यांनी आपले भाषण आवरते घेऊन काढतापाय घेतला.

जालना लोकसभा मतदारसंघात पैठण तालुक्यातील अनके गावात भाजपचे उमदेवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ गाव भेटी घेऊन बैठक घेण्यात आल्या. लिंबेगाव येथे शिवसेना आमदार संदीपान भुमरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार यांचे भाषण सुरू असतानाच गावातील महिलांनी हातात हंडे घेत बैठकीत दाखल झाल्या. आमच्या गावात पाणी टंचाई आहे, जनावरांना चार नाही आधी आमच्या समस्या सोडवा नंतर तुमचे भाषण ठोका अशा प्रकारे पवित्रा घेत भाषण बंद पाडले.

महिलांनी घेतलेल्या भुमिकेमुळे आमदार भुमरे आणि शिवसेना-भाजप नेते यांनी महिलांना बैठक झाल्यावर आपण चर्चा करू असे आवाहन केले.

मात्र गावकरी महिला यांचा रोष वाढत असल्याचे लक्षात घेत आमदार भुमरे यांनी आपले भाषण आवरते घेत, गावात अजून एक टॅंकरची व्यवस्था करतो असे सांगत गावातून काढतापाय घेतला.

291 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा