कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रास जैनसेवा संघातर्फे भगवान महावीर अध्यासनास १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी देण्यात आली.

भगवान महावीर अध्यासनासाठी १३ कोटी रुपये खर्चून भव्य वास्तू उभारली जाणार आहे. यातून जैनधर्माचे शास्त्रीय संशोधन व युवकांना मार्गदर्शन यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कार्य केले जाणार आहे. या कार्यासाठी जैनसेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेषत: सुरेश मगदूम, डॉ. महावीर मिठारी, अतुल पाटणे, संदीप अथणे, अजय कोले, भारत वणकुद्रे यांनी मिळून जैनसेवा संघामार्फत भगवान महावीर अध्यासनास १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली.

जैनसेवा संघ, कोल्हापूर गेली २० वर्षे सातत्याने युवकांच्या मध्ये विविध प्रकल्पातून धर्मभावना व सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. देणगी दिल्याबद्दल भगवान महावीर अध्यासनाच्या निधी संकलन समितीचे अध्यक्ष डॉ. जे एफ. पाटील व इतर सदस्यांनी आभार मानले आहेत. दानशूर व्यक्ती व संस्थांनी या कार्यास देणगी द्यावी, असे आवाहन भगवान महावीर अध्यासनाचे डॉ. विजय ककडे यांनी केले आहे. या देणगीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जैन सेवासंघाचे आभार मानले आहेत.