Breaking News

 

 

‘टिक टॉक’वरील बंदी कायम ; सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोशल मिडीयावर तुफान लोकप्रिय असलेल्या ‘टिक टॉक’या मोबाईल व्हिडीओ अ‍ॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने या अॅपवर बंदी आणली. या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले. मात्र सुप्रीम कोर्टाने बंदीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. 

कोर्टाने प्रसार माध्यमांना टिक टॉकवरील व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर दाखवू नका, असे आदेश दिले आहेत. यानंतर आता हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं.  मदुराई उच्च न्यायालयाच्या टीक टॉकवरील बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र तात्काळ सुनावणीस नकार दिला आहे. टिक-टॉक अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लिल व्हिडीओ असल्याने कोर्टाने हे आदेश दिले होते.

टिक टॉक हे चीनमधील एका कंपनीचे अ‍ॅप आहे. टिक टॉक अ‍ॅपच्या मदतीने छोटे व्हिडीओ तयार करुन त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात. या अ‍ॅपचे सध्या भारतात १.३ बिलियन युझर्स आहेत. 

590 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा