Breaking News

 

 

महाडिक मताधिक्क्याने निवडून येतील : पी.एन.पाटील

पन्हाळा (प्रतिनिधी) : विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यावर बोलायला एकही गोष्ट नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. पण करवीरची जनता सुज्ञ आहे ती अशा आरोपांना भुलणार नाही. खासदार धनंजय महाडिक मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास माजी आमदार पी एन पाटील यांनी व्यक्त केला. ते पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

या मेळाव्यात बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, विश्वासराव पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग काशीद यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व  अन्य मान्यवर उपस्थित होते.

800 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा