Breaking News

 

 

निवडणूक, आयपीएलचा फटका नव्या चित्रपटांना…

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकांची सुरूवात ११ एप्रिलपासून झाली आहे. सर्वत्र निवडणुकींच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यत फक्त राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या कालावधीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना मोठा फटका बसत आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. १७ एप्रिल रोजी तगडी स्टारकास्ट असलेला ‘कलंक’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याही चित्रपटाला फटका बसण्याची शक्यता आहे.

चित्रपटांच्या व्यवसायामध्ये ७० टक्के घट झाली आहे. एकीकडे निवडणूक तर दुसरीकडे आयपीएल चित्रपटांवर धोक्याचे सावट म्हणून फिरत आहे. निवडणुकींच्या काळात प्रदर्शित झालेला चित्रपट पहिल्या आठवड्यात फक्त ३० टक्क्यांपर्यंत मजल मारत आहे. ‘कलंक’ साठी अॅडव्हान्स बुकींग सुरू झाले आहे. पण सध्या निवडणुकींच्या रणधुमाळीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

342 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे