Breaking News

 

 

‘डीआरडीओ’च्या शिरपेचात मानाचा तुरा ! : ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : देशाच्या संरक्षण सिद्धतेत वाढ करणारी अभिमानास्पद कामगिरी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) केली आहे. आज (सोमवार) ओदिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या मोठ्या पल्ल्याच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राचा टप्पा तब्बल १ हजार किलोमीटरचा आहे.

युपीए सरकारच्या काळात २०१३ साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी ठीक ११.४५ वा. या क्षेपणास्त्राची चाचणी झाली. सबसॉनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती. त्याच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही समस्या होत्या. त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. हे क्षेपणास्त्र केवळ ४२ मिनिटात १००० किलोमीटरवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. तसेच रडारला चकवा देण्यासाठी ते केवळ १०० मीटर उंचीवरूनही जाऊ शकते.

अमेरिकन नौदलाकडे असलेल्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या धर्तीवर निर्भयची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे तब्बल १००० किलोमीटरवरील लक्ष्य साधता येणे शक्य होणार आहे. निर्भयच्या यशस्वी चाचणीमुळे शत्रूच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे

381 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा