पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील मृत्युंजय ग्रुपच्या वतीने वीस कुटुंबीयांना गृहोपयोगी वस्तू व शासकीय योजनेच्या कार्डचे वाटप माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.

मृत्युंजय ग्रुपने यापूर्वी कोरोना आणि पूरपरिस्थिती काळामध्ये गरीब जनतेसाठी जीवनोपयोगी वस्तूंचे, कपड्यांचे वाटप, रक्तदान शिबिर, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार, शालेय साहित्याचे वाटप, स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवले आहेत. समाजोपयोगी कार्यामध्ये नेहमी मृत्युंजय ग्रुपचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. १९९० मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. यावर्षी मंडळाने ३३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यावर्षी मंडळातर्फे भविष्यात येणाऱ्या नवनवीन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अमरसिंह भोसले, संग्रामसिंह भोसले यांनी दिली. याप्रसंगी अजय चौगले, नितीन भगवान, प्रकाश गवंडी, सुभाष गवळी, रणजित वरेकर, मंडळाचे अध्यक्ष सूरज भोसले, प्रशांत भोसले, रायबा भोसले, व मृत्युंजय ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.