Breaking News

 

 

जैन आहार हा सात्विक आहार : लक्ष्मीसेन महास्वामीजी

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : जैन आहार हा सात्त्विक गुणयुक्त असून तमोगुण कमी करणारा आहे. आहार हेच आपला स्वभाव ठरवत असतात, असे प्रतिपादन लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांनी केले. ते महावीर गाट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत जैन फूड व शॉपिंग फेस्टिवलमध्ये बोलत होते.

महावीर गाट सोशल फौंडेशन कोल्हापूर व जैन कपल ग्रूप यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिंद को-ऑप सोसायटी हॉल, रूईकर कॉलनी कोल्हापूर येथे आयोजित फेस्टिवलचे आयोजन केले होते. महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी फाऊंडेशनने जैन पध्दतीने बनवलेले खाद्य पदार्थ, कंद विरहित पदार्थ, बॅग्ज, पर्स, साडी, ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, जैन साहित्य, गृहोपयोगी वस्तू यांचे स्टॉल मांडण्यात आले होते. हे सर्व स्टॉल बहुतांश महिला मंडळाचे होते. तसेच ज्येष्ठ नेते महावीर गाट यांना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जयेश ओसवाल, नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम. अमितदादा गाट उपस्थित होते.

315 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा