अखेर जखमी मयूर मोकळ्या हवेत झेपावला…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यात वसगडे गावच्या पाणथळ भागात गावातील शितल कामटे तरुणाला एक मोर मुर्छितावस्थेत डबक्यात पडलेला आढळला. त्याने मित्रांच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. मोर जखमी असल्याने शितलला व्हाईट आर्मीची आठवण झाली. त्याने व्हाईट आर्मीला फोन करुन जखमी मोराची माहिती दिली. तासाभरातच व्हाईट आर्मीचे जवान गावातील शिवारात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील मोराची रवानगी रंकाळा येथील पक्षी निरीक्षण केंद्रात केली.

डॉ. अनिल पाटील यांच्या निरीक्षणाखाली गेली चार-पाच दिवस छातीवरील मुक्या मारावर उपचार केले. या उपचारामुळे मोराची  हालचाल वाढली. मोराला पूर्णपणे बरे वाटू लागल्यावर हा राष्ट्रीय पक्ष्याला आज व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, शिवशाहीर राजु राऊत, वनसेवक भगवान चौगुले यांनी मोर सापडलेल्या ठिकाणीच सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दुपारी व्हाईट आर्मीचे जवान या मोराला घेवून वसगडे गावात आले. त्याला मोकळ्या वातावरणात सोडण्यात आले. जखमी झालेला या मयूरने अखेर मोकळ्या हवेत श्वास घेतला. गेले पाच दिवस या मोराची सातत्याने काळजी घेणार्‍या विशालचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. बागल, सतिश पाटील, अजित आयरेकर, विरेंद्र पटेल, सुनील जाधव, सावलीच्या संचालिका गौरी देशपांडे उपस्थित होत्या.

1,005 total views, 27 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram