कोल्हापूरची स्वाभिमानी जनता मंडलिकांच्या पाठीशी : आ. क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचा खासदार कोल्हापूरचा व्हावा, ही  शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यानुसार राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीतील स्वाभिमानी जनता कधीच अमिषाला बळी पडली नसून, स्वाभिमानी जनता प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठाम असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेना – भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवाजी उद्यमनगर, यादवनगर परिसरातील प्रचार फेरीप्रसंगी ते बोलत होते.

बालावधुत तरून मंडळपासून शिवाजी उद्यमनगर, बालावाधुत तरुण मंडळ – यादवनगर चौक – डोंबार वाडा मेन रोड – के.आर.टी.व्ही.एस. शोरूमपर्यंत सदरची प्रचार फेरी काढत आली.

या प्रचार फेरीप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उपशहरप्रमुख दीपक चव्हाण, शिवसेना विभागप्रमुख अश्विन शेळके, शशिकांत रजपूत, दादू शिंदे, मंदार तपकिरे, देवेंद्र खराडे, टिंकू देशपांडे, नियाज पठाण, आसिफ मुल्लांनी, दिनेश साळोखे, विशाल देशपांडे, प्रदीप जानकर, अर्जुन शिंदे, विनोद शेंडगे आदी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

96 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram