विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा : अजिंक्य रहाणे, हृषभ पंतला वगळले

मुंबई (प्रतिनिधी) : इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. हृषभ पंत, अंबाटी रायडू, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, सुरेश रैना यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन मध्यमगती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव हे फिरकी गोलंदाज तसंच हार्दिक पांड्या, विजय शंकर, रवींद्र जडेजा आणि केदार जाधव हे अष्टपैलू खेळाडू आहेत. रवींद्र जडेजा आणि केदार जाधव यांचा उपयोग फिरकी गोलंदाज म्हणून आणि हार्दिक पांड्या, विजय शंकर यांचा वापर मध्यमगती गोलंदाज म्हणून करता येईल.

यंदाच्या विश्वचषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, विंडीज आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळेल, म्हणजेच प्रत्येक टीम ग्रुप साखळी सामन्यात ९ मॅच खेळणार आहे. यातल्या टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. ९ आणि ११ जुलैला उपांत्य सामने होणार असून १४ जुलै रोजी १४ जुलैला लॉर्ड्सवर अंतिम सामना खेळला जाणार आहे.

744 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram