Breaking News

 

 

राजकीय स्वार्थासाठी विरोधकांना सत्ता हवी आहे : नंदाताई बाभूळकर 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गेली पंचवीस वर्षे ज्यांच्या घरात खासदारकी होती. त्यांनी मी विकास करतो अशी वायफळ बडबड केली. विरोधकांना केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सत्ता हवी असल्याची टीका नंदाताई बाभूळकर यांनी केली. त्या गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे खा.धनंजय महाडिक यांच्या प्रचार  मेळाव्यात बोलत होत्या.

शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख इतकं मोठं पद तुमच्याकडे असताना तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं याचा हिशोब आधी जनतेला द्या असा टोला नंदाताई बाभूळकर यांनी लगावला.

यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालंदर पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर  विजय पाटील, उदय जोशी, नारायण चव्हाण, रायाप्पा करीगार, अमर चव्हाण, अजित देसाई, सागर देसाई, विठ्ठल कांबळे, दिलीप देसाई, तानाजी निकम आदी उपस्थित होते.

504 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा