शरद पवार, तुम्ही ‘ती’ हिंमत करू नका : सुधीर मुनगंटीवार

मुंबई (प्रतिनिधी) : ‘शरद पवार तुम्ही लक्षात घ्या, मोदींचा परिवार संपूर्ण १२५ कोटी जनता आहे. तुम्ही मोदींच्या परिवाराकडे लक्ष देण्याची हिंमत करू नका, असे प्रत्युत्तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलं आहे. आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल, असा इशारा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर सभेत दिला होता. त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी पवारांवर पलटवार केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे बजरंग सोनवणे यांच्या  प्रचारार्थ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये जाहीर झाली. या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल’ असा इशारा पवारांनी मोदींना जाहीर सभेत दिला होता.

‘मोदींना माझ्या कुटुंबाची काळजी आहे. ते म्हणतात, सगळा पक्ष पुतण्या चालवतो. पवारांची अवस्था गंभीर आहे. त्यांचं घरात कोणी ऐकत नाही. माझ्या घराची चिंता त्यांना. आम्ही सगळे एका जिवाभावाने वागतो. पण मोदीजी दुसऱ्याच्या घरात डोकावणं, हे वागणं बर नव्हं,’ अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीका केली होती.

711 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram