Breaking News

 

 

दिग्दर्शक यशवंत भालकर यांना गुरुवंदना…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मराठी चित्रपटाचे जेष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या गेल्या पन्नास वर्षातील चित्रपट क्षेत्रातील जीवनप्रवास गुरुवंदना या कार्यक्रमातून १७ एप्रिलरोजी दाखवला जाणार असल्याचे भालकर्स कला अकादमीचे संग्राम भालकर, सपना जाधव यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

गेले पन्नास वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवलेल्या कोल्हपूर भूषण यशवंत भालकर यांचा जीवनप्रवास यसबा या माहिती पटाद्वारे दाखवण्यात येणार आहे. त्याचे लेखन अश्विनी टेंबे यांनी केले असून निवेदन स्वप्निल राजशेखर,संकलन सैफ बारगीर आणि याचे दिग्दर्शन संग्राम भालकर यांनी केले आहे. १७ एप्रिलरोजी केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमात चित्रनगरी कोल्हापूरचे कार्यकारी संचालक संजय पाटील, दिग्दर्शक सतीश रणदिवे, भास्कर जाधव, माजी नगरसेवक आदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यशवंत भालकर यांच्या विविध चित्रपटातील निर्माते, छायाचित्ररकार, गीतकार यांचा सत्कार करण्यात येणार असून यामध्ये जे.के.पाटील, प्रकाश शिंदे, प्रताप गंगावणे, अशोक जाधव, मंदाताई निमसे, बाबासाहेब सौदागर यांचा समावेश आहे. तसेच अभिनेत्री प्रियांका यादव, अभिनेता देवेंद्र चौगुले, स्वप्निल राजशेखर, नितीन कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखती घेण्यात येणार आहेत. गुरुवंदना कार्यक्रमात साठ ते सत्तर कलाकारांचा समावेश आहे. याबरोबरच भालकर यांच्या चित्रपटातील गीतांवर नृत्यवंदना हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

यावेळी संदीप भालकर, सपना जाधव, निशा शहापुरे, राहूल जाधव, ऐश्वर्या टोणपे, उमेश चौगुले, ओंकार शेटे, विजय कांबळे आदी उपस्थित होते.

987 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा