Breaking News

 

 

अखेर संभाजी पवारांची नाराजी दूर : सांगली-हातकणंगलेत महायुतीचा प्रचार करणार !

सांगली (प्रतिनिधी) : भाजपमध्ये नाराज असलेले माजी आमदार संभाजी पवार यांनी अखेर खा. संजयकाका पाटील यांनी आपल्या गटाचा पाठिंबा जाहीर केला. यामुळे पाटील यांच्यापुढील पेच मिटला आहे. आ. सुरेश हळवणकर, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील यांनी रविवारी सायंकाळी संभाजी पवार, त्यांचे पुत्र पृथ्वीराज व गौतम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पवार यांच्याकडून भाजपच्या पाठिंब्याची घोषणा करण्यात आली.

पाच वर्षांपासून भाजपपासून दूर असलेले माजी आमदार संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी या नेत्यांनी केलेल्या शिष्टाईला अखेर यश आले. भाजप नेत्यांनी कधीच आम्हाला अंतर दिलेले नव्हते. गत लोकसभेवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते, त्यामुळे मी नाराज होतो. पण आता सांगली व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा ताकदीने प्रचार करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

आ. हाळवणकर म्हणाले की, मध्यंतरी मतभेद झाले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्याच हातात हवी, यासाठी महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली. त्याला सहमती दर्शवत संभाजी पवार यांनी संजयकाका पाटील यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

खा. पाटील म्हणाले की, पवार यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले. आमचे व त्यांचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. गत निवडणुकीवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते. पण आमच्यात कुठेही कटुता नव्हती. पवार यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांचा आशीर्वाद व शक्ती माझ्या पाठीशी राहणार आहे. 

768 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा