Breaking News

 

 

राहुल गांधी अडचणीत : सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणारे काँग्रेस अध्यक्ष अडचणीत आले आहेत. ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयानंही मान्य केलंय, असं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली आहे. २२ एप्रिलपर्यंत या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. 

‘राफेल’ खरेदी प्रकरणात नवी माहिती समोर आल्यानं त्यावर फेरसुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती न्यायालयानं मान्य केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा आरोप करताना चौकीदार चोर आहे, हे न्यायालयानंही मान्य केल्याचं म्हटलं होतं. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.

राहुल हे स्वत:ची मतं सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालत आहेत. त्यामुळं न्यायालयाचा अवमान झाला आहे,’ असं लेखी यांनी याचिकेत नमूद केलं होतं.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी खंडपीठानं राहुल यांना नोटीस बजावली. राफेल प्रकरणात न्यायालयानं पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कोणतंही मतप्रदर्शन केलेलं नाही. राहुल गांधींनी त्याचा विपर्यास केला आहे, असं खंडपीठानं नमूद केलं. 

1,110 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा