कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यतील तिटवे येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्नित शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाला चालू शैक्षणिक वर्षात नवीन मास्टर डिग्रीचे सूक्ष्म जीवशास्त्र (एम.एस्सी.- मायक्रो बायोलॉजी), रसायनशास्त्र (एम.एस्सी- केमिस्ट्री) आणि संगणक शास्त्र (एम.एस्सी- कॉम्प्युटर सायन्स) या पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासनाची मान्यता मिळाली आहे.

या लक्ष्मी महाविद्यालयामध्ये थेट प्रवेश मिळणार असल्याने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थिनींना एक मोठी संधी निर्माण झाली आहे. याचा लाभ पंचक्रोशीतील विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले आहे.

एम.एस्सी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमातून सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर टेस्टींग इंजिनिअर, आय. सिक्युरिटी स्पेशालिस्ट सारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. एम.एस्सी मायक्रोबायोलोजी या अभ्यासक्रमातून मायक्रोबायोलॉजिस्ट, क्लिनिकल रिसर्च असोशिएटस, मेडिकल कोडर, लेक्चरर, संशोधक, क्वालिटी कंट्रोल, एक्झिक्युटिव्ह इत्यादी सारख्या तसेच एम.एस्सी रसायनशास्त्र अभ्यासक्रमातून लेक्चरर, अॅनॅलॅटिकल केमिस्ट्री, अॅप्लिकेशन स्पेशालिस्ट, केमिस्ट, सारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत.

शहीद महाविद्यालयांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११० गावांमधील ९०० हून अधिक विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. येथे कॉम्प्युटर सायन्स, मास मीडिया, डी. एम. एल. टी., कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनीसारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत.

शिष्यवृत्तीस पात्र होणाऱ्या विद्यार्थिनींना निम्मी सवलत, तर एससी, एसटी वर्गवारीतील विद्यार्थिनींना १०० टक्के सवलत मिळणार आहे. वसतिगृह सुविधा असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थिनी आणि पालकांनी तिटवे येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात येथे संपर्क साधावा, असे आवाहन शहीद शिक्षण संस्थेने केले आहे.