वंचित आघाडीकडे एवढा पैसा येतो कोठून ? – पृथ्वीराज चव्हाण

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडी ही विरोधकांचे मतविभाजन करण्यासाठी स्थापन झाली आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे लाखो रुपये खर्च करून सभा घेतात. हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यासाठी यांच्याकडे एवढा पैसा येतो कोठून,  त्यांना कोण आर्थिक रसद पुरवित आहे, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

लोकसभा मतदारसंघाचे काँग्रसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापुरात आयोजित सभेत ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विरोधकांचे मतविभाजन करण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत. यातून अप्रत्यक्षरीत्या कोणाला मदत होत आहे, हे जनतेने ओळखावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करून मते मागण्यासाठी केला जात आहे असे सांगत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर हल्ला चढविला.

देशासमोरील समस्या वाढू नयेत, यासाठी जनतेने मोदींना सत्तेतून खाली खेचावे, असे सांगत, त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला १६० चा आकडासुद्धा पार करणे कठीण जाईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर उमेदवार हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, माजी आ. प्रा. तुकाराम बिडकर, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, डॉ. संतोष कोरपे, विजय कौसल यांची उपस्थिती होती.

570 total views, 15 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram