Breaking News

 

 

मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का ? जयाप्रदा यांचा आझम खान यांना सवाल

रामपूर (वृत्तसंस्था): आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस निवडणूक जिंकला तर लोकशाहीचे काय होईल ? समाजामध्ये महिलांना स्थान उरणार नाही. आम्ही कोठे जायचे ? मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का ? तुम्हाला काय वाटते मी घाबरुन रामपूर सोडून निघून जाईन ? मी रामपूर सोडणार नाही असे जयाप्रदा यांनी ठणकावून सांगितले.

जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आझम खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली. मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मी दोषी ठरलो तर निवडणुकीतून माघार घेईन असे आझम खान यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.

मी रामपूरमधून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. मी मंत्री होतो. त्यामुळे काय बोलायचे हे मला समजते. मी कोणाचे नाव घेतले, कोणाचा अपमान केला ? हे सिद्ध केले तर निवडणुकीतून माघार घेईन असे आझम खान म्हणाले.

894 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश