Breaking News

 

 

झारखंडमध्ये सीआरपीएफकडून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा ; जवान शहीद

रांची (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. यावेळी सीआरपीएफ जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला असून बेलभा घाट परिसरात ही चकमक सुरु होती.

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपाचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता, तर चार जवान शहीद झाले होते.

366 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा