Breaking News

 

 

मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपीस उचगांवमध्ये अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  हुपरी, गोकुळ शिरगांव, कुरुंदवाड पोलीस ठाण्यात मोक्कासह अनेक गुन्हे दाखल असलेला फरारी आरोपी सनी गौतम मोहिते (रा. रामनगर, उचगांव) याला उचगांव येथील उड्डाण पुलाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.

सनी मोहिते याच्यावर चोरी, मारामारीसह जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गेले वर्षभर तो फरारी होता. तो आज उचगांव येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस निरिक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने उचगांव येथील उड्डाण पुलाजवळ टेहळणी करुन तो आल्याचे दिसताच त्याला अटक केली.

या कारवाईत हवालदार राजू आडूळकर, सुनिल इंगवले, राम कोळी, सुरेश पाटील यांनी भाग घेतला.

765 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा