महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला प्रकरण : मुल्ला गँगचा म्होरक्या सलीमसह तिघांना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजारामपुरी परिसरातील यादवनगर येथील मुल्ला गँगच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला झाला होता. येथील चाळीस जणांवर मोक्काची कारवाई केल्यानंतर फरार झालेला या गँगचा म्होरक्या सलीम मुल्ला आणि त्याच्या दोन साथिदारांना जयसिंगपूर-मिरज रोडवरील निलजी फाट्याजवळील वस्तीवर आज (रविवार) अटक केली.

यादवनगर येथील मटका अड्डा चालवणाऱ्या सलीम मुल्ला आणि त्याची पत्नी नगरसेविका शमा मुल्ला याच्या अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा आणि त्यांच्या पथकाने धाड टाकली होती. यावेळी मुल्ला गँगने पोलीस पथकावर प्रतिहल्ला केला होता. यानंतर पोलीसांनी मुल्ला गँगच्या चाळीस जणांवर मोक्कातंर्गत कारवाई केली व यातील पंचवीस जणांना अटक केली. म्होरक्या सलीम मुल्लासह इतर फरारी झाले होते.

त्यांचा शोध सुरु असताना यातील तिघे जयसिंगपूर-मिरज रोडवर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक तानाजी सावंत यांनी आपल्या पथकासह जयसिंगपूर-मिरज रोडवर असणाऱ्या निलजी फाटा येथे नायकवडी मोहल्ला यांच्या वस्तीतील तहसिलदार यांच्या शेतामधील शेडमध्ये तिघेजण मिळून आले.यामध्ये सलीम मुल्ला, फिरोज मुल्ला आणि अभिजीत येडगे या तिघांना पोलीस पथाकाने अटक केली.

या पथकात पोलीस उपनिरिक्षक दादाराजे पवार, हवलदार इकबाल महात, राजू आडूळकर, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, राम कोळी, जितेंद्र भोसले यांचा समावेश होता.

729 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram