जेट एअरवेजचे वैमानिक उद्यापासून संपावर…

मुंबई (प्रतिनिधी) : कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजच्या संकटात आणखी वाढ झाली आहे. जेटच्या नॅशनल अॅविएटर गिल्ड ऑफ इंडिया या युनियनच्या १,१००  वैमानिकांनी उद्या (सोमवार) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांपासून पगार न दिल्याच्या निषेधार्थ वैमानिक संपावर जाणार आहेत. वैमानिकांच्या संपाच्या इशाऱ्यानंतर नागरी हवाई वाहतूकीचे महासंचालक व महासचिव जेटच्या सद्य स्थितीबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहेत.

शुक्रवारी आणि शनिवारी मुंबई व दिल्लीतील विमानतळांबाहेर जेटच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. गेल्या तीन महिन्यांपासून पगार  मिळाला नसल्यामुळे सध्या त्यांचे हाल सुरू असल्याचा आरोप वैमानिकांनी केला होता. तसेच जेटच्या समस्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी वैमानिकांकडून करण्यात आली होती.

153 total views, 18 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram