Breaking News

 

 

विरोधक पुन्हा म्हणतात, इव्हीएममध्ये गडबड ; सर्वोच्च न्यायालयात जाणार…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा राग आळवला आहे. ईव्हीएमसोबत लावलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधील रिअॅक्शन टाइम आणि त्यातून निघणाऱ्या पावतीवरून काँग्रेससह विरोधकांनी गंभीर आरोप केला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्यानेच व्हीव्हीपॅटमधून चुकीच्या नावांची पावती येत असल्याचा दावा करत याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

सेव्ह डेमोक्रसी (लोकशाही बचाव) या नावाने काँग्रेस नेते अभिषेक मनू संघवी, कपिल सिब्बल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज (रविवार) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मतदान केलेल्या पक्षाऐवजी व्हीव्हीपॅटमधून भलत्याच पक्षाच्या नावाची चिठ्ठी आल्याची मतदारांनी तक्रार केली आहे. याचा अर्थ ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला आहे, असा दावा संघवी यांनी केला.

व्हीव्हीपॅटमधून निघणाऱ्या पावत्यांच्या मोजणीसाठी ५ दिवस लागणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला त्यांची टीम वाढवायला सांगितली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटच्या पावत्या मोजण्यासाठी ५ दिवस लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. ईव्हीएममधील फेरफाराच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडून योग्य पावले उचलली जात आहेत, असं आम्हाला वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 

यावेळी या सर्व नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. आमचा मतदारांवर विश्वास आहे. पण मशीनवर नाही, असं सांगत १२ ते २४ तासांसाठी आम्हाला इव्हीम मशिन द्या. त्यात फेरफार कसा केला जातो, हे आम्ही निवडणूक आयोगाला दाखवून देऊ. याप्रकरणी आम्ही लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. 

399 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा