Breaking News

 

 

काँग्रेस म्हणजे गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरमधील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाली होती. दोघे कट्टर प्रतिस्पर्धी असून पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या भेटीवरुन तर्क वितर्क काढले जात असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदे त्या वेळी तिथे पोहोचले होते. प्रकाश आंबेडकर हॉटेलमध्ये असल्याचं कळताच सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली होती. काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. सुशीलकुमार शिदे यांच्या भेटीवरुन काँग्रेस गाढवपणा करणार हे वाटलंच होतं. भेटीचं राजकारण करणं काँग्रेसवाल्यांना चांगलंच जमतं’, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. निवडणूक हे लोक कोणाला निवडून देतात त्यावर अवलंबून असतं. पण असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक धडा शिकवतील’, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

786 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे